News 
    मासच्या अध्यक्षपदी राजेंद्र रानडे ,उपाध्यक्षपदी सुरिंदर अंबारदार. ( Manufacturers` Association of Satara )

    Posted On March 30,2016

      

    मास संचालक मंडळाची वर्ष २०१८- २० साठीची निवडणूक प्रक्रिया अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. यामध्ये दिनांक ३० मार्च २०१८ रोजी मास पदाधिकारी व कार्यकारिणी संचालकांची बिनविरोध एकमताने निवड झाली.

    तरी यानिमित्ताने दिनांक ०७ एप्रिल २०१८ रोजी “ नूतन पदाधिकारी पद्ग्रहण ” सभारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी मासचे मावळते अध्यक्ष मा. श्री. राजेश कोरपे यांचे हस्ते नूतन पदाधिकारी व कार्यकारिणी संचालकांचा सत्कार करण्यात आला.

    यामध्ये मा. श्री. राजेंद्र रानडे यांची अध्यक्षपदी ,श्री. सुरिंदर अंबारदार यांची उपाध्यक्षपदी, श्री. धैर्यशील भोसले यांची सचिवपदी, श्री. भरत शेठ यांची खजिनदारपदी, श्री.राजेंद्र मोहिते व मंगेश धबधबे यांची सहसचिवपदी निवड करण्यात आली.