News 
    सातारा औद्योगिक क्षेत्रातील समस्यांबाबत - मा. नामदार श्री. सुभाष देसाई साहेब ( Manufacturers` Association of Satara )

    Posted On February 23,2022

      

    सातारा औद्योगिक क्षेत्रातील समस्यांबाबत मास पदाधिकारी यांनी मा. नामदार मा. नामदार श्री. सुभाष देसाई साहेब, उद्योगमंत्री, महाराष्ट्र राज्य यांची दिनांक २३ फेब्रुवारी २०२२ रोजी मंत्रालय, मुंबई येथे भेट घेतली. 
    यावेळी सातारा औद्योगिक क्षेत्रातील रस्ते नूतनीकरण व दुरुस्ती, ग्रीन मास अंतर्गत कचरा प्रक्रिया प्रकल्प व सातारा अतिरिक्त औद्योगिक क्षेत्राकरिता महावितरणचे नूतन सबस्टेशन होणेबाबत निवेदन देण्यात येऊन सविस्तर चर्चा करण्यात आली. सदर विषयाबाबत मा. मंत्री महोदय यांनी त्वरित कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.

    यावेळी मा. मास अध्यक्ष श्री. उदय देशमुख, उपाध्यक्ष श्री. राजेंद्र मोहिते, खजिनदार श्री. भरत शेठ व मास कार्यकारिणी सदस्य व मास MIDC कमिटीचे चेअरमन श्री. जितेंद्र जाधव उपस्थित होते.