MAS Admin. Program
Shashikantji Shinde Visit in MAS

MAS Bhavan,P-76, Additional M.I.D.C, Satara, 415 004.  April 13,2018

  

सातारा औद्योगिक वसाहतीतील उद्योजकांना अनेक समस्या भेडसावत आहेत.त्यातील काही महत्वाच्या समस्या आपणापुढे मांडत आहोत. यासमस्याबाबत गेली अनेक वर्षे संबंधित शासकीय अधिकारी यांचेशी पत्रव्यवहार व मिटिंगव्दारे पाठपुरावा करण्यात आला आहे. तरी सुद्धा सदरचे विषय सोडविण्याबाबत संबंधित विभागाकडून कोणतीही कार्यवाही झालेली आढळून येत नाही. याबाबत कृपया आपण स्वत: लक्ष घातल्यास उद्योजकांना निश्चितच दिलासा मिळेल, असा आम्हास पूर्ण विश्वास आहे.

  1. सातारा येथे एम आय डी सी चे प्रादेशिक कार्यालय व कार्यकारी अभियंता कार्यालय होणेबाबत : सातारा व जिल्ह्यात सुमारे १२-१३ औद्योगिक क्षेत्र कार्यान्वित आहेत व ८ नवीन सरू होणाऱ्या प्रास्ताविक औद्योगिक क्षेत्रे आहेत. तरी सातारा येथे एम आय डी सी चे प्रादेशिक अधिकारी व कार्यकारी अभियंता कार्यालय होणे गरजेचे आहे. हा निर्णय त्वरीत व्हावा.
  2. उद्योग भवन : सातारा जिल्ह्यात सध्याचे उद्योग व नवीन औद्योगिक क्षेत्रात वाढणारे उद्योग व्यवसाय विचारात घेऊन सध्याच्या जिल्हा उद्योग केंद्राच्या प्रशस्त जागेत त्वरीत उद्योग भवनाची उभारणी करण्यात यावी. या ठिकाणी एक खिडकी योजना अधिक परिणाम कारक रीतीन अंमलात आणता येईल.
  3. औद्योगिक कचऱ्याबाबत : सद्यस्थितीत सातारा औद्योगिक क्षेत्रातील उद्योजकांना उद्योगामधून निघणाऱ्या कचऱ्याची विल्हेवाट लावणे, हि एक मोठी समस्या निर्माण झालेली आहे. आज आपण सर्वत्र आपला परिसर, गाव शहर स्वच्छ करण्याचे व स्वच्छ ठेवण्याचे प्रयत्न पाहत आहोत. केंद्र सरकारने देखील स्वच्छ भारत योजना सुरु करून यामध्ये आपला सहभाग दाखवला आहे. या अनुषंगाने मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन ऑफ सातारा ( मास )च्या माध्यमातून उद्योजकांची मिटिंग आयोजित करून सदर विषयाबाबत सविस्तर चर्चा व माहिती संकलन करण्याचे काम सुरु आहे. सदर समस्येमधून मार्ग काढण्यासाठी मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन ऑफ सातारा ( मास ) ने ग्रीन मास (Green MAS) या उपक्रमा अंतर्गत सातारा औद्योगिक क्षेत्र स्वच्छ, सुंदर व आरोग्यदायी बनविण्याची योजना आखली आहे. ग्रीन मास (Green MAS) या उपक्रमास कचऱ्याचे संकलन व

व्यवस्थापन करण्याचे योजिले आहे. या योजनेच्या सफलतेसाठी सुरुवात करताना मासला Bio- degradable, Paper, woods, plastic and Hazardable कचरा वेगळा करून साठवण्याची व्यवस्था करणेसाठी जागेची आवश्यकता आहे.