MAS Security
पोलीस मित्र सभा

  July 20,2023

  

मा. श्री. समीर शेख, (भापोसे) पोलीस अधीक्षक, सातारा यांच्या अध्यक्षतेखाली उद्योजकांच्या पोलीस विभागाशी संबंधीत समस्यांबाबत दिनांक  २० जुलै २०२३ रोजी सकाळी १०.३० वाजता “ शिवतेज हॉल”, राधिका रोड, सातारा तालुका पोलीस स्टेशन शेजारी, सातारा येथे मिटिंग आयोजित करण्यात आली होती. 
यावेळी मिटिंगच्या सुरुवातीस मा. मास अध्यक्ष श्री. राजेंद्र मोहिते यांचा पोलीस विभागाच्या वतीने मा. श्री. समीर शेख यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. त्यानंतर मिटींगला सुरुवात करण्यात आली. 

यावेळी मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन ऑफ सातारा (मास) वतीने खालील विषय मांडण्यात आले. 
•    सातारा औद्योगिक क्षेत्रामध्ये पोलीस स्टेशन होणेबाबत – पोलीस विभाग यांचेकडून शासनाकडे( गृह मंत्रालय कार्यालय, मुंबई) यांचेकडे प्रस्ताव पाठवण्यात आलेला आहे. 
•    दर तीन महिन्याने पोलीस मित्र मिटिंग पोलीस विभागाकडून मासभवन येथे आयोजित करण्यात यावी.
•    अतिरिक्त एमआयडीसी दूरक्षेत्र पुन्हा सुरु करावे – याबाबत मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सातारा पोलीस स्टेशन सदर ठिकाणी प्रत्यक्ष पाहणी करून त्याप्रमाणे सदर पोलीस दूरक्षेत्राचे कर्मचारी नियुक्त करण्याचे आदेश दिले.
•    फक्त सातारा औद्योगिक क्षेत्र व लगतच्या परिसरामध्ये पोलीस विभागामार्फत टू व्हीलर किंवा PCR गाडी पेट्रोलिंग सुरु करून पोलीस पेट्रोलिंग गाडीची नोंद उद्योगांच्या गेट करण्यात यावी तसेच भंगारगोळा करणाऱ्या बायकांना अटकाव करण्यासाठी २४ तास महिला पोलीस कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात यावी. – पोलीस पेट्रोलिंग गाडी सुरु करून सदर गाडीची नोंद कंपनीच्या गेटवर करण्याच्या सूचना दिल्या. 
•    सुटकेस चौक परिसरामध्ये सायंकाळी ०५ ते ०७ दरम्यान बहुसंख्येने महिला कर्मचारी बसची वाट पाहत उभे असतात. त्यावेळी पोलीस पेट्रोलिंग गाडी सदर ठिकाणी उभी असावी. – याबाबत पोलीस पेट्रोलिंग गाडी सदर ठिकाणी उभी करण्याचे सूचना केली.
•    अनाधिकृत टपऱ्या काढणेबाबत कार्यवाहीसाठी पोलीस संरक्षण देण्यात यावे. – याबाबत मा. पोलीस अधीक्षक महोदय यांनी एम आय डी सी ऑफिस सातारा कार्यालयाने तारीख कळविल्यास त्यांना त्वरित पोलीस संरक्षण देण्यात यावे. अशी सूचना मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक, शहर पोलीस स्टेशन, यांना दिल्या. 
•    सातारा औद्योगिक क्षेत्रामध्ये रस्त्यावर वाहने उभी असतात.- याबाबत सदर वाहनांवर कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी. तसेच त्याअगोदर कार्यवाही करण्यात येणार असल्याचे पत्र मास कार्यालयास देण्याचे सांगितले.    
•    इत्यादी विषयांचे निवेदन देण्यात येऊन सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी मा. पोलीस अधीक्षक महोदय यांनी सदर त्वरित कार्यवाही सुचना संबंधित अधिकारी यांना दिल्या. 

सदर मिटिंग मा.मास खजिनदार श्री. भरत शेठ, मास कार्यकारिणी सदस्य व मास सिक्युरिटी कमिटी चेअरमन श्री. संजोग मोहिते, मास सभासद श्री. श्रीनिवास वाठारे श्री. नितीन देशपांडे, कॉर्पोरेट हेड & एच आर, कुपर कॉर्पोरेशन प्रा.लि. सातारा व इतर जिल्ह्यातील औद्योगिक संघटनाचे प्रतिनिधी, उद्योजक बहुसंख्येने उपस्थित होते.