MIDC 
Hon. Shri. Devendraji Phadnvis Meeting

  May 22,2023

  

मा. नामदार श्री. देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांचेसोबत कराड येथे झालेल्या मिटिंग नंतर मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन ऑफ सातारा (मास) पदाधिकारी यांनी केलेल्या विनंतीस मान देऊन मा. श्री. शिवाजी पाटील, उप मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र विकास महामंडळ (MIDC), मुंबई यांनी दिनांक २२ जून २०२३ मासभवनला भेट देऊन सातारा औद्योगिक क्षेत्रातील समस्या व विकासात्मक धोरणाबाबत चर्चा केली. मिटिंगच्या सुरुवातीस मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन ऑफ सातारा (मास) च्या वतीने मा. मास अध्यक्ष श्री. राजेंद्रकुमार मोहिते यांनी मा. श्री. शिवाजी पाटील, उप मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र विकास महामंडळ (MIDC) , मुंबई व मा. श्री. सुधीर नागे, अधीक्षक अभियंता, महाराष्ट्र विकास महामंडळ (MIDC) , पुणे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी सातारा औद्योगिक क्षेत्रालगत नवीन प्रस्तावित औद्योगिक वसाहत होणेबाबत, सातारा औद्योगिक क्षेत्रातील रस्ते नूतनीकरण कामाचा आढावा, सातारा व अतिरिक्त सातारा औद्योगिक क्षेत्रातील अनाधिकृत टपऱ्या काढणे, महावितरणला नवीन उपकेंद्र उभारणीसाठी अतिरिक्त औद्योगिक क्षेत्रामध्ये त्वरित भूखंड मिळणे, कचरा प्रक्रिया प्रकल्प, ट्रक टर्मिनस सुविधा, कर्मचारी राज्य विमा निगम (ESIC) हॉस्पिटल उभारणीसाठी दूध डेअरी जागा हस्तांरण, सातारा येथे मंजूर झालेले प्रादेशिक अधिकारी, MIDC कार्यालय त्वरित व्हावे व ग्रामपंचायत कर इत्यादी विषयाचे निवेदन देण्यात येऊन सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी मा. पाटील साहेबांनी सकारात्मक सदर विषयाबाबत पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले. यावेळी मा. मास उपाध्यक्ष श्री. जितेंद्र जाधव, सचिव श्री.धैर्यशील भोसले, खजिनदार श्री. भरत शेठ सहसचिव श्री.दीपक पाटील, सहसचिव श्री. राजेश चोप्रा, श्री. ए. ए. ढोरे, कार्यकारी अभियंता, महाराष्ट्र विकास महामंडळ (MIDC), कोल्हापूर, मा. श्री. लहू कसबे, उपअभियंता,महाराष्ट्र विकास महामंडळ (MIDC), सातारा व मा. श्री. विकास गायकवाड, सहा. अभियंता, महाराष्ट्र विकास महामंडळ (MIDC), सातारा, उपस्थित होते.