MIDC 
MIDC मास पदाधिकारी व मा. श्री. सुधीर नागे, अधीक्षक अभियंता, धिकारी यांची संयुक्त मिटिंग

  June 05,2023

  

सातारा औद्योगिक क्षेत्रातील उद्योजकांच्या महाराष्ट्र विकास महामंडळ (MIDC) विभागाशी संबंधीत समस्यांबाबत मा. मास पदाधिकारी व मा. श्री. सुधीर नागे, अधीक्षक अभियंता, महाराष्ट्र विकास महामंडळ (MIDC), पुणे व अधिकारी यांची संयुक्त मिटिंग दिनांक ०५ जून २०२३ रोजी मासभवन येथे संपन्न झाली. मिटिंगच्या सुरुवातीस मा. मास अध्यक्ष श्री. राजेंद्रकुमार मोहिते यांनी मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन ऑफ सातारा (मास) मार्फत मा. श्री. सुधीर नागे, अधीक्षक अभियंता, महाराष्ट्र विकास महामंडळ (MIDC) , पुणे, मा. श्री. ए. ए. ढोरे, कार्यकारी अभियंता, महाराष्ट्र विकास महामंडळ (MIDC), कोल्हापूर व मा. श्री. विकास गायकवाड, सहा. अभियंता, महाराष्ट्र विकास महामंडळ (MIDC), सातारा, यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी सातारा औद्योगिक क्षेत्रातील रस्ते नूतनीकरण कामाचा आढावा,, रस्त्याच्या दोन्ही बाजूची विशेष करून वळणावरील झाडे- झुडपे काढून तसेच गटर्स स्वच्छ करणेबाबत, सातारा व अतिरिक्त सातारा औद्योगिक क्षेत्रातील पथदिवे दुरुस्तीबाबत, अनाधिकृत टपऱ्या काढणे, बसथांबे दुरुस्ती व सातारा व अति. सातारा औद्योगिक क्षेत्रात ठीकठिकाणी सार्वजनिक स्वच्छता गृह व्यवस्था करणेबाबत इत्यादी विषयाचे निवेदन देण्यात येऊन सविस्तर चर्चा करण्यात आली. Blind कॉर्नर्स, पथदिवे ह्याबाबत MIDC ऑफिस मास सोबत coordination करून काम मार्गी लावण्यात येतील. फायर स्टेशन इमारत बांधकामचे काम सुरु असून लवकरच पूर्ण होईल. सातारा व अति सातारा औद्योगिक क्षेत्रामध्ये मोकळ्या जागेवर उद्योजकांच्या सहकार्याने वृक्षारोपण-ऑक्सिजन पार्क प्रपोजल बाबत पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले. मिटिंगनंतर जागतिक पर्यावरणदिनानिमित्त मासभवन परीसरामध्ये मान्यवरांचे हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी मा. सचिव श्री.धैर्यशील भोसले, सहसचिव श्री.दीपक पाटील, सहसचिव श्री. राजेश चोप्रा, माजी अध्यक्ष श्री.उदय देशमुख, मास कार्यकारिणी सदस्य श्री. संजोग मोहिते, श्री.केतन कोटणीस, श्री.शिवाजीराव फडतरे, श्री. श्रीकांत तोडकर, श्री.संग्रामसिंह कोरपे, उपस्थित होते.