MSEDCL Department
वीज संदर्भातील समस्याबाबत चर्चा करणयासाठी मास व महाराष्ट्र राज्य वीज वितरण कं. यांची संयुक्त मिटींग

  May 18,2023

  

सातारा औद्योगिक क्षेत्रातील वीज संदर्भातील समस्याबाबत चर्चा करणयासाठी मास व महाराष्ट्र राज्य वीज वितरण कं. यांची संयुक्त मिटींग दिनांक १८ मे २०२३ रोजी मासभवन, सातारा येथे आयोजित करण्यात आली होती. 

सदर मिटींगसाठी मा.मास पदाधिकारी सोबत महावितरण अधिकारी उपस्थित होते. ते पुढीलप्रमाणे
१.    मा.श्री. राजेंद्रकुमार मोहिते, अध्यक्ष, मास. 
२.    मा. श्री. जितेंद्र जाधव, उपाध्यक्ष, मास.
३.    मा. श्री. धैर्यशील भोसले, सचिव, मास.
४.    मा. श्री. भरत शेठ, खजिनदार, मास.
५.    मा. श्री. राजेश चोप्रा, सहसचिव व मास वीज कमिटी चेअरमन. 
६.    मा. श्री. दीपक पाटील, सहसचिव, मास.
७.    मा. श्री. केतन कोटणीस, कार्यकारिणी सदस्य, मास.
८.    मा. श्री. सुहास फरांदे, कार्यकारिणी सदस्य, मास.
९.    मा. श्री. आदित्य मुतालिक, कार्यकारिणी सदस्य, मास.
१०.    मा. श्री. संग्रामसिंह कोरपे, कार्यकारिणी सदस्य,मास.
११.    मा. श्री. ईशान मळेकर,कार्य कारिणी सदस्य, मास.
१२.    मा. श्री. प्रशांत शिंदे, कार्यकारिणी सदस्य, मास.
१३.    मा. श्री. अमित बारटक्के, कार्यकारी अभियंता, महावितरण, सातारा 
१४.    मा. श्री. सिकंदर मुलाणी, अभियंता, महावितरण, सातारा. 

मिटिंगच्या सुरुवातीस मास अध्यक्ष श्री. राजेंद्रकुमार मोहिते यांनी मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन ऑफ सातारा (मास) मार्फत मा. श्री. अमित बारटक्के, कार्यकारी अभियंता, महावितरण, सातारा यांचा स्वागत केले 
सदर मिटींग मध्ये खालील विषयाबाबत चर्चा करण्यात आली.

१.    औद्योगिक क्षेत्रातील महावितरण DP चा परिसर स्वच्छ करणेबाबत. - सदर मिटिंगमध्ये महावितरण विभागाशी संदर्भातील उद्योजकांच्या समस्या व सुचना बाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. यामध्ये प्रामुख्याने औद्योगिक क्षेत्रातील महावितरण DP चा परिसर स्वच्छ करण्यात येऊन खराब झालेले बॉक्सेस बदलण्याचे ठरले. तसेच पावसाळया अगोदरची मेटेनन्सची कामे पूर्ण करण्याचे ठरले.
सदर मिटिंगमध्ये मा. श्री. अमित बारटक्के, कार्यकारी अभियंता, महावितरण, सातारा यांनी मास पदाधिकारी यांनी उपस्थित केलेल्या समस्या सदर महिन्यामध्ये सर्व समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले. तसेच मास कार्यालयाने उद्योजकांना आवाहन करून उद्योगा जवळील Distribution boxes खराब झाले असतील अथवा परिसरामध्ये झाडे-झुडपे वाढलेले असल्यास कृपया सदरची माहिती फोटोसह ऑफिस कार्यालयास मागवून घेऊन महावितरणला पाठवून द्यावी. त्यावर त्वरित कार्यवाही करण्यात येईल.   
२.    औदयोगिक क्षेत्रात वीज पुरवठा ट्रीप होण्याचे प्रमाण वाढले आहे - गेल्या काही दिवसात सातारा औदयोगिक क्षेत्रात ट्रीप झाले होते, भविष्यातील वाढणाऱ्या मागणीसाठी योग्य ती तरतूद करावी. – याबाबत सातारा व सातारा औद्योगिक क्षेत्रातील फीडरनुसार Previous Maintains ची कामे सुरु करून पावसाळया अगोदर सर्व कामे पूर्ण करण्याचे आश्वासन दिले.
३.    महावितरणला नवीन उपकेंद्र उभारणीसाठी त्वरित भूखंड मिळणेबाबत – सदर विषयाबाबत महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडे जागा ३५ गुंठे जागा मागणी केलेली असून त्याचा निर्णय प्रलंबित आहे. तरी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी व महाराष्ट्र विद्युत पारेषण कंपनी ह्या एकमेकांशी संबंधित असल्याने सातारा अतिरिक्त औद्योगिक क्षेत्रातील पारेषणकडील भूखंडामधील ६० गुंठे जागा महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडे त्वरित वर्ग करून त्याबदली महावितरणला नवीन सबस्टेशन उभारणीकरीता जागा मिळू शकेल. अशा दोन्ही प्रकारे प्रयत्न करण्याचे ठरले. 
याबाबत मा. श्री. अमित बारटक्के, कार्यकारी अभियंता, महावितरण, सातारा यांनी महावितरण करून महापारेषण कडे पत्र व्यवहार करण्यात येईल. तसेच आवश्यकता भासत असल्यास मास, महावितरण व महापारेषण यांची संयुक्त मिटिंग आयोजित करण्यात येईल.
४.    वीज कनेक्शन : महावितरणकडून नवीन अथवा जुन्या उद्योजकांना कनेक्शन घेताना महावितरण कनेक्शन बाबत असलेल्या योजना बहुतांश उद्योजकांना माहिती नाहीत. सदरची माहिती मास कार्यालयास पाठवून देण्यात यावी. मास कार्यालयाकडून सदरची माहिती उद्योजकांना पाठवण्यात येईल. तसेच मास मासिक मध्ये प्रसिद्ध करण्यात येईल. याबाबत मा. श्री. अमित बारटक्के, कार्यकारी अभियंता, महावितरण, सातारा यांनी महावितरण असलेल्या योजना यांची माहिती मास कार्यालयास पाठवून देण्यात येईल. 
५.    सातारा व सातारा औद्योगिक क्षेत्रामध्ये रस्त्यांची नूतनीकरणाची कामे सुरु आहेत. अनेक ठिकाणी रस्त्यांची उंची वाढल्यामुळे महावितरण वीज खांब यांची उंची कमी झालेली असल्याने कंटेनर वीज वाहक तारांना लागून अपघात होऊ शकतो तसेच त्यामुळे वीज पुरवठा खंडित होऊ शकतो. त्यामुळे महावितरणने पाहणी करून वीज खांबांची उंची वाढवावी.
याबाबत मा. श्री. अमित बारटक्के, कार्यकारी अभियंता, महावितरण, सातारा यांनी सदर ठिकाणची पाहणी करून त्याप्रमाणे कार्यवाही करण्यात येईल असे सांगितले.