Business Training
MAS Kaizen Competition – 2023

  April 24,2023

  

मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन ऑफ सातारा (मास)च्या माध्यमातून सातारा जिल्ह्यातील उद्योजकांसाठी वेगवेगळ्या विषयावर सेमिनार, कार्यशाळा व उपक्रम आयोजित करण्यात येत असतात. यातील एक भाग म्हणून मास बिझनेस प्रमोशन & व्होकेशनल ट्रेनिंग कमिटी मार्फत “ MAS Kaizen Competition – 2023” चे आयोजन दिनांक २४ एप्रिल २०२३ रोजी मासभवन येथे करण्यात आले होते. सदर स्पर्धेमध्ये १६ टीमनी सहभाग नोंदवला होता. MAS Kaizen Competition – 2023 स्पर्धेतील विजेते खालील प्रमाणे प्रथम क्रमांक – Cooper Corporation Pvt. Ltd. – Aspire व्दितीय क्रमांक - Mutha Engineering Pvt. Ltd – United Army तृतीय क्रमांक – Paranjape Autocast Pvt.Ltd. – Team Warrious. MAS Kaizen Competition – 2023 च्या स्पर्धेकरिता परीक्षक म्हणून मा. श्री. प्रा. मांडवे, व मा.श्री. तन्मय यांनी कामकाज पहिले. सदर कार्यक्रम वेळी मास अध्यक्ष श्री. राजेंद्र मोहिते यांचे हस्ते MAS Kaizen Competition – 2023 परीक्षक मा. श्री. प्रा. मांडवे, व मा.श्री. तन्मय यांचे पुष्प झाड देऊन स्वागत करण्यात आले. सदर कार्यक्रमास मास उपाध्यक्ष श्री. जितेंद्र जाधव, सचिव श्री. धैर्यशील भोसले, मास खजिनदार श्री. भरत शेठ, सहसचिव श्री. दीपक पाटील, मास माजी अध्यक्ष श्री. दिलीप उटकूर, मास कार्यकारिणी सदस्य व चेअरमन, बिझनेस प्रमोशन & व्होकेशनल ट्रेनिंग कमिटी श्री. अनुप मुथा, मास कार्यकारिणी सदस्य श्री. आदित्य मुतालिक, श्री. संग्राम कोरपे, उद्योजक व उद्योग प्रतिनिधी उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक मास कार्यकारिणी सदस्य व चेअरमन, बिझनेस प्रमोशन & व्होकेशनल ट्रेनिंग कमिटी श्री. अनुप मुथा यांनी केले व आभार मास कार्यकारिणी सदस्य श्री. आदित्य मुतालिक यांनी मानले. मास ऑफिस