MSEDCL Department
औद्योगिक क्षेत्रातील उद्योजकांच्या महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कं. मर्या. (MSEDCL) विभागाशी संबंधीत समस्यांबाबत मिटिंग

  May 18,2023

  

मा. मास सभासद,

आपणास कळविण्यात येते की,  मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन ऑफ सातारा ( मास ) मार्फत सातारा औद्योगिक क्षेत्रातील उद्योजकांच्या महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कं. मर्या. (MSEDCL) विभागाशी संबंधीत समस्यांबाबत    मा. मास पदाधिकारी व  मा. कार्यकारी अभियंता, महावितरण, सातारा व औद्योगिक क्षेत्र संबंधित महावितरणचे अधिकारी यांची संयुक्त मिटिंग  दिनांक १८ मे २०२३ रोजी दुपारी १२ वाजता मासभवन येथे संपन्न झाली. 

सदर मिटिंगमध्ये महावितरण अधिकारी यांनी महावितरण विभागाच्या संदर्भातील उद्योजकांना असलेल्या समस्यां सोडविण्याचे आश्वासन दिले आहे. यामध्ये प्रामुख्याने पावसाळया अगोदर पूर्व मेंटेनन्स करण्यात येईल. ट्रान्सफॉर्मर जवळील खराब झालेले Distribution boxes बदलण्यात येतील व आजूबाजूचा परिसर स्वच्छ करण्याचे मान्य केले. 

तरी सर्व उद्योजकांनी आपल्या उद्योगा जवळील Distribution boxes खराब झाले असतील अथवा परिसरामध्ये झाडे-झुडपे वाढलेले असल्यास कृपया सदरची माहिती फोटोसह ऑफिस कार्यालयास प्रत्यक्ष अथवा  [email protected] ला ईमेलव्दारे पाठवून द्यावी. ही विनंती.

कळावे,
आपला विश्वासू 
मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन ऑफ सातारा ( मास ) करीता,


राजेश चोप्रा 
चेअरमन, 
मास वीज कमिटी