MAS Admin. Program
मा. श्री. संग्रामसिंह कोरपे वाढदिवस कार्यक्रम

  May 13,2022

  

सद्यस्थितीतील जागतिक तापमान वाढीमुळे वृक्षारोपणाचे महत्व लक्षात घेऊन नूतन मास कार्यकारिणी सदस्यांनी वृक्षारोपण करून वाढदिवस साजरा करण्याचे ठरविले आहे.

याची सुरुवात यावर्षातील मास कार्यकारिणी सदस्यांमधील प्रथम वाढदिवस मास ग्रीन कमिटीचे चेअरमन श्री. संग्रामसिंह कोरपे यांचे वाढदिवसानिमित्त मासभवन वृक्षारोपण करून करण्यात आली. 

यावेळी मा. मास अध्यक्ष श्री. राजेंद्रकुमार मोहिते यांनी सर्व मास सभासदांना आवाहन केले की, मास सभासदांनी आपल्या वाढदिवसानिमित्त किमान एक तरी झाड लावावे. जेणेकरून पृथ्वी संवर्धनास आपला हातभार लागेल. त्याचप्रमाणे सातारा औद्योगिक परिसर हिरवागार होण्यासाठी मदत होईल.