MAS Admin. Program
मास व जिल्हा उद्योग केंद्र मिटिंग.

  May 12,2022

  

सातारा औद्योगिक क्षेत्रातील उद्योजकांना जिल्हा उद्योग केंद्र, सातारा यांचेकडे उद्योगांसाठी असलेल्या योजना व त्यांचा उपयोग उद्योजकांना कशा प्रकारे करता येईल. त्याचप्रमाणे उद्योगवाढी संदर्भात निर्यात व इतर विषयाबाबत सविस्तर चर्चा करणेसाठी मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन ऑफ सातारा (मास) पदाधिकारी  मा. महाव्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र, सातारा व जिल्हा उद्योग केंद्र सातारा कार्यालयामधील  अधिकारी यांची संयुक्त मिटिंग दिनांक १२ मे २०२२ रोजी “मासभवन” येथे आयोजित करण्यात आली होती.

 

मिटिंगच्या सुरुवातीस मा. मास अध्यक्ष श्री. राजेंद्रकुमार मोहिते यांनी मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन ऑफ सातारा (मास) मार्फत मा. श्री. उमेश दंडगव्हाळ, महाव्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र, सातारा यांचा स्वागत सत्कार करण्यात आला.

 

सदर मिटिंगमध्ये उद्योगवाढी साठी शासनामार्फत सुरु असलेल्या योजनांची माहिती घेण्यात आली. सदरची माहिती उद्योजकांना पाठवण्याचे ठरले. तसेच जिल्हा उद्योग मित्र सभा मधील विषयाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

 

सदर मिटिंगला मास उपाध्यक्ष श्री. जितेंद्र जाधव , सचिव श्री. धैर्यशील भोसले, खजिनदार श्री. भरत शेठ, सहसचिव श्री. राजेश चोप्रा, श्री. दीपक पाटील, मास कार्यकारिणी सदस्य श्री प्रशांत शिंदे, मा. श्री. अमित बारटक्के, कार्यकारी अभियंता, महावितरण श्री. जितेंद्र माने अतिरिक्त कार्यकारी अभियंता, महावितरण, मा. श्री. प्रशांत यादव, कनिष्ठ अभियंता, महावितरण, सातारा उपस्थित होते

 
मास ऑफिस