MAS Admin. Program
वस्तू व सेवा कर - अभय योजना.

  May 11,2022

  

महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प सादर करताना मा. अर्थमंत्र्यांनी व्यापार आणि उद्योगक्षेत्राला आर्थिक दिलासा देणारी अभय योजना ०१ एप्रिल २०२२ पासून अंमलात आली आहे. या योजनेतील तरतुदीनुसार ३१.०३.२०२२ रोजी ३०.०६.२०१७ पूर्वीची जी करदात्याची थकबाकीला ही योजना लागू होणार आहे.

 

या योजनेची सविस्तर माहिती सातारा जिल्ह्यातील उद्योजकांना देण्यासाठी वस्तू व सेवा कर, उपआयुक्त सातारा यांचे कार्यालय मार्फत “मासभवन” मध्ये दिनांक ११ मे २०२२ रोजी चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते .

 

सदर चर्चासत्रास मा. श्री. अनिल धोत्रे, उपआयुक्त, राज्यकर, सातारा व मा. सौ. जाई वाकचौरे, उपआयुक्त, उपायुक्त श्री खेडकर व उपायुक्त श्री शेवाळे  ,वस्तू व सेवा कर विभाग,  सातारा यांनी उद्योजकांना मार्गदर्शन केले. तसेच उपस्थित उद्योजकांनी याबाबत विचारलेल्या प्रश्नांचे समर्पक उत्तरे देऊन निरसन केले.

 

सदर कार्यक्रम वेळी मा. मास अध्यक्ष श्री. राजेंद्र मोहिते यांचे हस्ते मान्यवरांचे स्वागत सत्कार करण्यात आला. यावेळी मास. उपाध्यक्ष श्री. जितेंद्र जाधव, मा. मास सचिव श्री. धैर्यशील भोसले, मास सहसचिव श्री. राजेश चोप्रा मा. मास कार्यकारिणी सदस्य श्री. आदित्य मुतालिक, GST practitioners असोसिएशन चे अध्यक्ष श्री प्रवीण शाह व  बहुसंख्येने उद्योजक, उद्योग प्रतिनिधी  उपस्थित होते.