MSEDCL Department
मास व महावितरण मिटिंग.

महावितरण मुख्य कार्यालय, कृष्णानगर, सातारा   May 11,2022

  

सातारा औद्योगिक क्षेत्रातील उद्योजकांच्या महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कं. मर्या. (MSEDCL)  विभागाशी संबंधीत समस्यांबाबत मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन ऑफ सातारा (मास) पदाधिकारी  मा. अधीक्षक अभियंता, महावितरण, सातारा व औद्योगिक क्षेत्र संबंधित महावितरणचे अधिकारी यांची संयुक्त मिटिंग दिनांक ११ मे २०२२ रोजी महावितरण मुख्य कार्यालय, कृष्णानगर सातारा येथे आयोजित करण्यात आली होती.

 

मिटिंगच्या सुरुवातीस महावितरण तर्फे नूतन मास पदाधिकारी यांचा सत्कार करण्यात आला. तसेच मा. मास अध्यक्ष श्री. राजेंद्रकुमार मोहिते यांनी मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन ऑफ सातारा (मास) मार्फत मा. श्री. गौतम गायकवाड अधीक्षक अभियंता, महावितरण, सातारा यांचा स्वागत सत्कार करण्यात आला.

 

सदर मिटिंगमध्ये महावितरण विभागाशी संदर्भातील उद्योजकांच्या समस्या व सुचना बाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. यामध्ये प्रामुख्याने औद्योगिक क्षेत्रातील महावितरण DP चा परिसर स्वच्छ करण्यात येऊन खराब झालेले बॉक्सेस बदलण्याचे ठरले. तसेच पावसाळया अगोदरची मेटेनन्सची कामे पूर्ण करण्याचे ठरले. सदर मिटिंगमध्ये मा. श्री. गौतम गायकवाड अधीक्षक अभियंता, महावितरण यांनी मास पदाधिकारी यांनी उपस्थित केलेल्या समस्या सदर महिन्यामध्ये सर्व समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले.

 

सदर मिटिंगला मास उपाध्यक्ष श्री. जितेंद्र जाधव , सचिव श्री. धैर्यशील भोसले, खजिनदार श्री. भरत शेठ, मास वीज कमिटी चेअरमन व सहसचिव श्री. राजेश चोप्रा, सहसचिव श्री. दीपक पाटील, मास कार्यकारिणी सदस्य श्री प्रशांत शिंदे, मा. श्री. अमित बारटक्के, कार्यकारी अभियंता, महावितरण श्री. जितेंद्र माने अतिरिक्त कार्यकारी अभियंता, महावितरण, मा. श्री. प्रशांत यादव, कनिष्ठ अभियंता, महावितरण, सातारा उपस्थित होते

 
मास ऑफिस