MAS Admin. Program
मा. नामदार श्री. दिलीप वळसे-पाटीलसाहेब, गृहमंत्री, महाराष्ट्र राज्य भेट.

सर्किट हाउस, सातारा  May 09,2022

  

सातारा औद्योगिक क्षेत्रातील समस्यांबाबत मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन ऑफ सातारा (मास) पदाधिकारी यांनी मा. नामदार श्री. दिलीप वळसे-पाटीलसाहेब, गृहमंत्री, महाराष्ट्र राज्य यांची आज  दिनांक ०९ मे २०२२ रोजी सातारा येथे भेट घेतली. यावेळी सातारा औद्योगिक क्षेत्राकरिता स्वतंत्र पोलीस स्टेशन होणेबाबत विषयाचे निवेदन देण्यात येऊन सविस्तर चर्चा करण्यात आली. सदर विषयाबाबत मा. गृहमंत्री महोदयांनी सातारा औद्योगिक वसाहतीकरीता स्वतंत्र पोलीस स्टेशन होणेबाबत त्वरित कार्यवाही करण्याचे व उद्योजकांना सर्वोतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. यावेळी मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन ऑफ सातारा (मास) संस्थेचे मा. अध्यक्ष श्री. राजेंद्रकुमार मोहिते,सचिव श्री. धैर्यशील भोसले, सहसचिव श्री. दीपक पाटील, कार्यकारिणी सदस्य श्री. केतन कोटणीस, व श्री. संग्रामसिंह कोरपे उपस्थित होते.