MAS Admin. Program
मा. खासदार श्री. शरदचंद्रजी पवारसाहेब भेट.

सर्किट हाउस, सातारा   May 08,2022

  

सातारा औद्योगिक क्षेत्रातील समस्यांबाबत मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन ऑफ सातारा (मास) पदाधिकारी यांनी मा. खासदार श्री. शरदचंद्रजी पवारसाहेब, यांची दिनांक ०८ मे २०२२ रोजी सातारा येथे भेट घेतली.

 

यावेळी सातारा औद्योगिक क्षेत्रातील रस्ते नूतनीकरण व दुरुस्ती, सातारा येथे RO MIDC  कार्यालय, महाराष्ट्र स्कूटर लि. जागेत व्यवसाय सुरु होणे, सातारा येथे ESIC हॉस्पिटल होणेबाबत, नवीन प्रस्तावित औद्योगिक वसाहत, ग्रीन मास अंतर्गत कचरा प्रक्रिया प्रकल्प व सातारा अतिरिक्त औद्योगिक क्षेत्राकरिता महावितरणचे नूतन सबस्टेशन होणेबाबत इत्यादी विषयाबाबतचे निवेदन देण्यात येऊन सविस्तर चर्चा करण्यात आली. सदर विषयाबाबत मा. पवार साहेबांनी त्वरित कार्यवाही करण्याचे व उद्योजकांना सर्वोतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

 

यावेळी मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन ऑफ सातारा (मास) संस्थेचे मा. अध्यक्ष श्री. राजेंद्रकुमार मोहिते, उपाध्यक्ष श्री. जितेंद्र जाधव, सचिव श्री. धैर्यशील भोसले, सहसचिव श्री. राजेश चोप्रा, माजी अध्यक्ष श्री उदय देशमुख कार्यकारिणी सदस्य श्री. केतन कोटणीस, श्री. शिवाजीराव फडतरे, श्री. संतोष महामुलकर, श्री. पृथ्वीराज पोळ, श्री. संग्रामसिंह कोरपे व श्री. प्रशांत शिंदे उपस्थित होते.