MAS Admin. Program
मा. मास पदाधिकारी व कार्यकारिणी सदस्य निवड २०२२-२४

"मासभवन", पी-७६, अतिरिक्त MIDC, सातारा   April 07,2022

  

मास संचालक मंडळाची वर्ष २०२२-२४ साठीची निवडणूक प्रक्रिया अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. यामध्ये दिनांक २६ मार्च २०२२ रोजी २० कार्यकारिणी सदस्य यांची निवडणुकीव्दारे निवड झाली व दिनांक २८ मार्च २०२२ रोजी मास पदाधिकारी यांची पण एकमताने बिनविरोध निवड झाली.

 

यामध्ये मास अध्यक्षपदी  मा. श्री. राजेंद्रकुमार मोहिते यांची, मा. श्री. जितेंद्र  जाधव उपाध्यक्षपदी, श्री. धैर्यशील भोसले यांची सचिवपदी, श्री. भरत शेठ यांची खजिनदारपदी, व श्री.दीपक पाटील आणि श्री. राजेश चोप्रा यांची सहसचिवपदी निवड करण्यात आली.

तसेच मास कार्यकारिणी सदस्य म्हणून श्री. संग्रामसिंह कोरपे, श्री. केतन कोटणीस, श्री. जयंत महाजन, श्री. संतोष महामुलकर, श्री. ईशान मळेकर, श्री. संजोग मोहिते, श्री. आदित्य मुतालिक, श्री. अनुप मुथा, श्री. शिवाजीराव फडतरे, श्री. सुहास फरांदे, श्री. पृथ्वीराज पोळ, श्री प्रशांत शिंदे, श्री. राहुल शिंदे व श्री. श्रीकांत तोडकर यांची निवड केली, असल्याचे मास निवडणूक समिती चेअरमन श्री. वसंत फडतरे यांनी जाहीर केले.

 

नूतन मास अध्यक्ष श्री. राजेंद्रकुमार मोहिते हे यशस्वी उद्योजक असून अनेक वर्षे मास मास कार्यकारिणी सदस्य म्हणून कार्यरत आहेत. तसेच मास उपाध्यक्ष म्हणून गेली ०३ वर्षे कामकाज पाहत होते. श्री राजेंद्र मोहिते हे विविध क्रीडा संघटनांच्या माध्यमातून खेळाडूंना मदत करत असतात तसेच इतर अनेक सामाजिक व सार्वजनिक संस्थांमध्ये विविध पदावर कार्यरत आहेत.   

ह्या निवडीप्रसंगी मावळते अध्यक्ष श्री. उदय देशमुख यांनी त्यांच्या अध्यक्षीय काळात केलेल्या उत्तम कार्याचा गुणगौरव व सत्कार करण्यात आला. श्री. उदय देशमुख यांनी सर्व कार्यकारिणीने केलेल्या सहकार्याबद्दल आभार व्यक्त करून नूतन अध्यक्ष, पदाधिकारी व कार्यकारिणी सदस्य यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.