MAS Admin. Program
फायनान्स मॅनेजमेंट

satara  February 26,2022

  

उद्योगांसाठी नेहमीच ज्वलंत प्रश्न असतो तो म्हणजे फायनान्स मॅनेजमेंट. 

फायनान्स मॅनेजमेंट असो वा अकौंटिंग, रोजच्या व्यस्ततेमुळे लघु उद्योजक याकडे थोडे लक्ष कमी देतो व कालांतराने हाच मुद्दा धोक्याचा ठरतो व उद्योजकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. 

या अनुषंगाने आपण सर्व मिळून पुढील मुद्यांवर माहिती घेणे  सध्या खूप गरजेचे आहे. 

१) उद्योगात आर्थिक व्यवस्थापन खरच गरजेचे आहे का ?

२) व्यवसायाचा ताळेबंद नाही समजला म्हणून काय फरक पडतो..

३) व्यवसायातील धोक्याची लक्षणें कशी ओळखाल ?

४) व्यवसायातील आर्थिक निर्णय कसे घ्याल ?

५) व्यवसायाचे आरोग्य कसे तपासाल.

६) आर्थिक  व्यवसाथापान चांगले करून व्यवसाय वृद्धी कशी करावी .

म्हणूनच आपणा सर्वांसाठी शनिवार दिनांक 26 फेब्रुवारी रोजी मोफत सेमिनार नियोजित केला आहे. 

या चर्चासत्रासाठी आपल्याला या विषयातील तज्ञ सी. ए. श्री. नरेंद्र जोशी यांचे मार्गदर्शन लाभणार आहे.

तरी सर्वांनी यात सहभागी व्हावे.
हा कार्यक्रम लघु उद्योग भारती सातारा इकाई व मास यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला आहे.

ठिकाण : मास भवन , Addln. MIDC, सातारा

वेळ : शनिवार दि. 26 फेब्रुवारी 2022 रोजी सकाळी 10.30 ते 1.30

कार्यक्रमाची सांगता प्रश्नोत्तरानी होईल.


श्री.पृथ्वीराज पोळ
सचिव
लघु उद्योग भारती सातारा इकाई