MAS Admin. Program
सातारा औद्योगिक क्षेत्रातील रस्ते नूतनीकरण व दुरुस्ती

satara  February 27,2022

  

सातारा औद्योगिक क्षेत्रातील समस्यांबाबत मा.श्री.छ. उदयनराजे भोसले साहेब, खासदार यांचेसोबत मास पदाधिकारी यांची दिनांक २७ फेब्रुवारी २०२२ रोजी मासभवन सातारा येथे मिटिंग संपन्न झाली. 

यावेळी सातारा औद्योगिक क्षेत्रातील रस्ते नूतनीकरण व दुरुस्ती, ग्रीन मास अंतर्गत कचरा प्रक्रिया प्रकल्प, सातारा अतिरिक्त औद्योगिक क्षेत्राकरिता महावितरणचे नूतन सबस्टेशन होणेबाबत, एमआयडीसी हद्दवाढ  त्याचप्रमाणे एमआयडीसीचे प्रादेशिक कार्यालय सातारा येथे होणेबाबत निवेदन देण्यात येऊन सविस्तर चर्चा करण्यात आली. 

सदर विषयाबाबत मा. खासदार महोदय यांनी त्वरित एमआयडीसी अधिकारी यांचेसोबत सोमवार दिनांक २८ फेब्रुवारी रोजी मिटिंग आयोजित करून उद्योजकांच्या समस्या सोडविण्यासाठी व उद्योगवाढीसाठी सर्वोतरी मदत करण्यात येईल असे सांगितले. त्याचप्रमाणे आवश्यकता वाटल्यास वरिष्ठ एमआयडीसी अधिकारी सह माननीय उद्योगमंत्री यांचे सोबत मास पदाधिकारी यांची मिटिंग आयोजित करण्याचे आश्वासन दिले. 

यावेळी मा. मास अध्यक्ष श्री. उदय देशमुख, उपाध्यक्ष श्री. राजेंद्र मोहिते, सचिव श्री. धैर्यशील भोसले, खजिनदार श्री. भरत शेठ, सहसचिव श्री दीपक पाटील, मास कार्यकारिणी सदस्य व मास MIDC कमिटीचे चेअरमन श्री. जितेंद्र जाधव, श्री केतन कोटणीस, श्री. संग्राम कोरपे, मास सदस्य श्री. मंगेश धबधबे व श्री. लोकेश उतेकर उपस्थित होते