MAS Admin. Program
MAS Vardhapan Din - 2021

"MASBhavan",P-76, Addl. MIDC, Satara  December 22,2021

  

दरवर्षी प्रमाणे यावर्षीही मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन ऑफ सातारा ( मास ) च्या वर्धापनदिन निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. दिनांक २२ डिसेंबर २०२१ रोजी बालाजी ब्लड बँक, सातारा यांचे सहकार्याने रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. त्यास उत्तम प्रतिसाद मिळाला. विक्रमी सुमारे ४१६ रक्तदात्यांनी रक्तदान केले.

 

त्यानंतर सायं. ७.०० वाजता मास वर्धापनदिनाचे मुख्य कार्यक्रमास मा. श्री. मिनाज मुल्ला, उपविभागीय अधिकारी, सातारा हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीस मास अध्यक्ष श्री. उदय देशमुख यांचे हस्ते श्री. मिनाज मुल्ला, उपविभागीय अधिकारी, सातारा यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाच्या सुरुवातीस मास बुलेटीन – स्पेशल अंक मास वर्धापनदिन चे मान्यवरांचे हस्ते प्रकाशित करण्यात आला.

 

मास अध्यक्ष श्री. उदय देशमुख यांनी मासच्या मागील दोन वर्ष भरातील कार्याचा आढावा घेतला. यानंतर प्रमुख पाहुणे यांचे हस्ते खालील मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.

 

  1. सातारा औद्योगिक क्षेत्रात उद्योगाची पायाभरणी करणारे जेष्ठ उद्योजक पुरस्कार – सन्मानपत्र.

            

  • मा. श्री. अजित बारटक्के – बारटक्के इलेक्ट्रोफॅब प्रा. लि.
  • मा. श्री. सतीश पेठकर सुपर टेक
  • मा. श्री. अरुण जाधव  अजिंक्य प्लॅस्टिक प्रा. लि.
  • मा. श्री. हेमंत बर्गे नितीन इंडस्ट्रीज
  • मा. श्री. दिलीप उटकुर उत्कर्ष ट्रान्समिशन प्रा. लि.
  • मा. श्री. शिरीष खुटाळे – खुटाळे इंजिनिअरींग प्रा. लि.
  1. सातारा औद्योगिक क्षेत्रातील उद्योजकांना केलेल्या विशेष सहकार्याबद्दल - मास उद्योगमित्र  पुरस्कार.

१. मा. श्री. देविदास ताम्हाणे, आपत्ती व्यवस्थापन ऑफिसर, जिल्हाधिकारी कार्यालय, सातारा.

२. मा. सौ. अर्पणा जोगळेकर, क्षेत्रीय व्यवस्थापक, बँक ऑफ महाराष्ट्र, सातारा.

 

  1. औद्योगिक क्षेत्रात साताऱ्याचे नाव उज्ज्वल करणारे उद्योजक – गौरवचिन्ह.
  • मा. श्री. फारोख कुपर – कुपर कॉर्पोरेशन प्रा.लि.
  • मा. श्री. श्रीकांत पवार – टॉप गिअर ट्रान्समिशन प्रा. लि.
  • मा. श्री. कौस्तुभ फडतरे – कवित्सू रोबोट्रॉनिक्स प्रा. लि.
  • मा. श्री. सचिन शिंदे – प्रिसाईज सिस्टीम

तसेच सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मास सचिव श्री. धैर्यशील भोसले यांनी केले व आभार मास उपाध्यक्ष श्री. राजेंद्र मोहिते यांनी मानले. सदर कार्यक्रमास मास सहसचिव श्री. दीपक पाटील, कार्यकारिणी सदस्य श्री. नितीन माने, श्री. संजोग मोहिते, श्री. राजेश चोप्रा, श्री.जितेंद्र जाधव, श्री. श्रीकांत तोडकर, श्री. पृथ्वीराज पोळ, श्री. शिवाजीराव फडतरे, श्री.संग्रामसिंह कोरपे, माजी अध्यक्ष श्री. सुनिल व्यवहारे श्री. राजेश कोरपे, जेष्ठ उद्योजक श्री. अजित मुथा, श्री. आचारे, क्षेत्रीय व्यवस्थापक, MIDC, श्री. जितेंद्र माने, अति. कार्यकारी अभियंता महावितरण व त्यांचे सहकारी तसेच औद्योगिक क्षेत्रातील उद्योजक बहुसंख्येने उपस्थित होते.