Social Work
  रक्तदान शिबिर माउली ब्लड बँक, सातारा यांचे सहकार्याने “मासभवन” येथे आयोजित करण्यात आले होते.

  Satara  September 20,2021

  रक्तदान शिबिर माउली ब्लड बँक, सातारा यांचे सहकार्याने “मासभवन” येथे आयोजित करण्यात आले होते.:  

  माननीय मास सभासद,

  सातारा जिल्ह्यातील रक्ताचा तुटवडा लक्षात घेऊन सामाजिक बांधिलकी नात्याने रक्तदान शिबिर माउली ब्लड बँक, सातारा यांचे सहकार्याने “मासभवन” येथे आयोजित करण्यात आले होते. कोविड १९ च्या काळातही मासच्या प्रतिसादाला उद्योजक व कामगार-कर्मचारी यांनी उत्तम प्रकारे सहकार्य केले यावेळी सुमारे ४३ रक्तदात्यांनी रक्तदान केले. 

  त्याबद्दल सर्व मास कार्यकारिणी सदस्य, मास सभासद, उद्योजक व कामगार-कर्मचारी यांचे आभार, आपले असेच सहकार्य मिळत राहो ही अपेक्षा. 
  धन्यवाद !

  कळावे,
  आपला विश्वासू 
  मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन ऑफ सातारा ( मास ) करीता,


  धैर्यशील भोसले 
  सचिव