Meetings with Govt. & NGO`S
    केंद्रीय उद्योग व निर्यात विभागाचे वरिष्ठ अधिकारी यांचे उपस्थितीत ऑनलाईन मिटिंग

    Masbhavan  August 06,2021

    केंद्रीय उद्योग व निर्यात विभागाचे वरिष्ठ अधिकारी यांचे उपस्थितीत ऑनलाईन मिटिंग :  

    मा. मास सभासद, आपल्या भारत देशातील निर्यातवाढीसाठी मा. पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदीजी यांचे अध्यक्षतेखाली केंद्रीय उद्योग व निर्यात विभाग मधील मा. मंत्री महोदय व संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी यांचे उपस्थितीत ऑनलाईन मिटिंग दिनांक ०६ ऑगस्ट २०२१ रोजी सायंकाळी ०६ वाजता संपन्न झाली. यावेळी मा. श्री. राजेंद्र मोहिते उपाध्यक्ष मास, मा. श्री. भरत शेठ, खजिनदार, मा. श्री. सागर कलाणी, सहसचिव, मा. श्री. दिलीप उटकूर, माजी अध्यक्ष, मा. श्री. पराग काटदरे, मास कार्यकारिणी सदस्य, मुथा ग्रुपचे प्रतिनिधी, तसेच मा. श्री. श्रीपाद दामले, उद्योग अधिकारी, जिल्हा उद्योग केंद्र सातारा व इतर अधिकारी वर्ग जिल्हा उद्योग केंद्र, सातारा मासभवन मधून सदर मिटिंगला सहभागी झाले होते.