MSEDCL Department
उद्योगामधील वीज व इतर इंधन वापर नियोजन बाबत कार्यशाळा.

  February 05,2021

  

मा. मास सभासद ,

 

मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन ऑफ सातारा (मास) व ई-इफिशिएन्शी मॅनेजमेंट कन्सल्टन्सी प्रा. लि. यांचे संयुक्त विद्यमाने उद्योगामधील वीज व इतर इंधन वापर नियोजन बाबत कार्यशाळा शुक्रवार दिनांक ०५ फेब्रुवारी २०२१ रोजी सकाळी  ११.३० वाजता मासभवन येथे आयोजित करण्यात आली आहे.   

 

महाराष्ट्रातील वीजदर शेजारील सर्व राज्यांपेक्षा २०% ते ५०% जास्त आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील उद्योग तुलनात्मक दृष्ट्या स्पर्धात्मक होऊ शकत नाहीत. अशा परिस्थितीत उत्पादन खर्च कमी करणे हा शक्य असलेला पर्याय आहे. अनेक उद्योगांमध्ये वीज वापर जास्त प्रमाणात असतो. तेथे वीज हा अत्यंत महत्त्वाचा कच्चा माल असतो. अशा ठिकाणी वीज वापर कमी करणे अत्यंत महत्वाचे ठरते...

 

आपण उद्योगांत अनेक प्रकारची उर्जा वापरतो. वीज, गॅस, वाफ, इ. अनेक प्रकारच्या उर्जेचा वापर होतो. हा सर्व वापर किमान पातळीवर आणणे, त्या द्वारे उत्पादन खर्च कमी करणे यासाठी सर्व उपाय योजना सुचविणे व त्या अंमलात आणण्यासाठी सर्व प्रयत्न व सहकार्य करणे,

 

यासाठी श्री. महावीर जैन (CA) हे काम करीत आहेत. त्यांच्या अनुभवाचा व तज्ञ सहकारी टीमचा सर्वांना निश्चित उपयोग होऊ शकेल. त्याचप्रमाणे सदर कार्यशाळेस मा. श्री. प्रताप होगाडे, अध्यक्ष, वीज ग्राहक व औद्योगिक संघटना राज्यस्तरीय समन्वय समिती उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. तरी सदर कार्यशाळेस मास सभासद यांनी बहुसंख्येने उपस्थित रहावे. ही विनंती.

 

कळावे,

आपला विश्वासू

मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन ऑफ सातारा ( मास ) करीता,

 

 

धैर्यशील भोसले

सचिव