MSEDCL Department
MAS & MSEDCL Co- ordiantion Meeting.

  December 23,2020

  

मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन ऑफ सातारा ( मास ) मार्फत सातारा औद्योगिक क्षेत्रातील उद्योजकांच्या महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कं. मर्या. (MSEDCL)  विभागाशी संबंधीत समस्यांबाबत मा. मास पदाधिकारी व  मा. श्री. गौतम गायकवाड अधीक्षक अभियंता, महावितरण, सातारा व औद्योगिक क्षेत्र संबंधित महावितरणचे अधिकारी यांची संयुक्त मिटिंग दिनांक २३ डिसेंबर २०२० रोजी सकाळी ११ वाजता, “ मासभवन” पी-७६, अतिरिक्त एमआयडीसी; सातारा येथे मास अध्यक्ष श्री उदय देशमुख यांचे अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. सदर मिटिंगला मासकडून सर्व उद्योजकांना भेडसावणारे प्रश्न मांडण्यात आले. तसेच उपस्थित उद्योजकांनी महावितरण संबंधित समस्या व अडचणी मांडल्या . उपस्थित नसलेल्या उद्योजकांच्या परंतु मास ला ज्ञात असलेल्या समस्या  व प्रश्न ही ह्या मीटिंग मध्ये मांडले गेले  व ह्या प्रश्नांबाबत MSEB अधिकारी व  उपस्थितांनी सविस्तर चर्चा केली. सदर प्रश्न व समस्यांबाबत मा. श्री. गौतम गायकवाड अधीक्षक अभियंता, महावितरण, व महावितरण अधिकारी यांनी समर्पक उत्तरे देऊन मार्गदर्शन केले व शंका निरसन केले. त्याचप्रमाणे पुढील दोन महिन्यामध्ये औद्योगिक क्षेत्रातील महावितरण विभागा संबंधित समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले व त्याबद्दल चा फीडर वाईज प्लॅन मास सोबत शेयर करण्याचे मान्य केले. जे उद्योजक सदर मिटिंगला उपस्थित नव्हते, त्यांनी स्वत: उपस्थित राहून प्रश्न व समस्या मांडले असते, तर तेथील वास्तविकता पटवून देऊन त्याबाबत महावितरणला कार्यवाही करणे सोयीस्कर झाले असते. तरी सदस्य उद्योजकांनी अथवा त्यांचे प्रतिनिधी यांनी अशा मिटिंगला उपस्थित असणे आवश्यक आहे. सदर मिटिंगला मा. मास अध्यक्ष श्री. उदय देशमुख, उपाध्यक्ष श्री. राजेंद्र मोहिते, सचिव श्री. धैर्यशील भोसले, खजिनदार श्री. भरत शेठ, सहसचिव श्री. दीपक पाटील, मास वीज कमिटी चेअरमन श्री. केतन कोटणीस, महावितरण कार्य.अभियंता श्री. सुनिलकुमार माने, अति. कार्य.अभियंता श्री. जितेंद्र माने, उप. कार्य. अभियंता श्री. अविनाश खुस्पे, कनिष्ठ अभियंता श्री. प्रशांत यादव, मास कार्यकारिणी सदस्य श्री. संजय सूर्यवंशी, श्री श्रीकांत तोडकर, श्री. पृथ्वीराज पोळ व उद्योग प्रतिनिधी उपस्थित होते.