MAS Admin. Program
शोकसभा

"MASBhavan", P-76, Addl. MIDC, Satara  September 02,2020

  

जेष्ठ उद्योजक व मास माजी अध्यक्ष श्री. सुरिंदर अंबारदार यांचे सोमवार, दिनांक ३१ ऑगस्ट २०२० रोजी दु: खद निधन झाले आहे.

 

शिक्षण पूर्ण केल्यानंतर नोकरी पासून सुरुवात करून एक यशस्वी उद्योजक पर्यंतचा प्रवास वाखाणण्याजोगा होता. सध्या त्यांचे जनरल रबर प्रोडक्ट व रबरकेम इंडस्ट्रीज नावाने दोन उद्योग सुरु आहेत.

 

त्याचबरोबर त्यांनी सामाजिक क्षेत्रात मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन ऑफ सातारा ( मास ) संस्थेमध्ये अध्यक्ष, उपाध्यक्ष व सलग ३ वेळा खजिनदारपदी कामकाज पहिले होते.   

 

विशेषत: कोविड-१९ विषाणूमुळे लॉकडाऊन काळामध्ये उद्योग सुरु होण्यासाठी व उद्योग सुरु करताना उद्योगांना येत असलेल्या अडीअडचणीबाबत नियमित शासन दरबारी पाठपुरावा करून उद्योजकांच्या समस्या सोडविल्या होत्या.

 

त्याचप्रमाणे त्यांनी रोटरी क्लब व आनंदबन ( मतिमंद मुलांची शाळा ) संस्थेमध्ये अध्यक्ष, सचिव खजिनदारपदी काम केले होते. 

 

त्यांच्या अचानक निधनामुळे सर्व मास सभासद, उद्योजकांना धक्का बसलेला आहे. सातारा औद्योगिक क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर नुकसान होऊन कधीही भरून न येणारी पोकळी निर्माण झाली आहे. मास पदाधिकारी, कार्यकारिणी सदस्य व सभासद त्यांच्या कुटुंबियांच्या दु:खात सहभागी आहोत. ईश्वर मृतात्म्यास चिरशांती देवो.

 

आदरणीय श्री. सुरिंदर अंबारदार सरांनी मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन ऑफ सातारा ( मास ) संस्थेमध्ये केलेले कार्य सर्व उद्योजकांना नेहमीच प्रेरणादायी व स्मरणीय राहील. सर्व उद्योजक सदैव त्यांच्या ऋणात राहतील.

 

मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन ऑफ सातारा ( मास ) करीता,

 

 

उदय देशमुख, अध्यक्ष

व मास संचालक मंडळ