MAS Admin. Program
Hon. S.P. Satara Meeting

S.P. office, Satara  November 23,2020

  

मा. नूतन पोलीस अधीक्षक,सातारा, श्री. अजयकुमार बंसल (भा.पो.से.) यांची मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन ऑफ सातारा ( मास ) चे अध्यक्ष श्री उदय देशमुख ,उपाध्यक्ष श्री राजेंद्र मोहिते यांचे नेतृत्वाखाली मास पदाधिकारी व संचालक यांनी भेट घेऊन पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

त्याचप्रमाणे अलीकडेच सातारा औद्योगिक क्षेत्रामध्ये गुंडगिरी, कामगार- कर्मचाऱ्यांना मारहाण, लुटमार या सारख्या घटना मध्ये वाढ होऊन भीतीचे वातावरण निर्माण होत आहे. मागील आठवड्या मध्ये सातारा औद्योगिक वसाहतीतील काही  उद्योजक यांना लुटण्याचा प्रयत्न झाला व उद्योगामधील कामगार यांना मारहाण करण्यात आली त्याबाबत निवेदन मासतर्फे देण्यात आले.

 याबाबत योग्य ती कारवाई करू,असे आश्वासन मा. पोलीस अधीक्षकांनी मास शिष्टमंडळाला दिले.