MAS Admin. Program
औद्योगिक सुरक्षा विषयक कार्यशाळा

  

मा. मास  सभासद ,
 

औद्योगिक् सुरक्षा व आरोग्य संचालनालय, सातारा व मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन ऑफ सातारा ( मास ) यांचे संयुक्त विद्यमाने ४९ वा औद्योगिक सुरक्षा सप्ताहा ( ०४ मार्च ते ११ मार्च २०२०) निमित्त औद्योगिक सुरक्षेबाबत प्रशिक्षण देणे व जनजागृती करणेच्या उद्देशाने औद्योगिक सुरक्षा विषयक कार्यशाळा शुक्रवार, दिनांक  ०६ मार्च २०२० रोजी  सकाळी  १०.३० वाजता “मासभवन”, नवीन एम आय डी सी, सातारा येथे आयोजित करण्यात आली आहे. 

 

सदर कार्यशाळेस श्री.अ.मो.अवसरे, उपसंचालक, औद्योगिक् सुरक्षा व आरोग्य संचालनालय, सातारा तसेच औद्योगिक सुरक्षा क्षेत्रातील तज्ञ व्यक्ती मार्गदर्शन करणार आहेत.  

 

तरी सर्व उद्योजकांनी सदर कार्यशाळेस स्वत:  उपस्थित रहावे अथवा आपले प्रतिनिधी पाठवावेत.  ही विनंती.

 

मास ऑफिस