MIDC 
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (MIDC) विभागाशी संबंधीत समस्यांबाबत मिटिंग.

  March 09,2020

  

मा. मास सभासद
आपणास कळविण्यात येते की,  मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन ऑफ सातारा ( मास ) मार्फत सातारा औद्योगिक क्षेत्रातील उद्योजकांच्या महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (MIDC)  विभागाशी संबंधीत समस्यांबाबत मा. मास पदाधिकारी व मा. श्री. अविनाश सुभेदार, सह-मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, मुंबई व त्यांचे अधिकारी यांची संयुक्त मिटिंग सोमवार, दिनांक ०९ मार्च २०२० रोजी सकाळी ११ वाजता मासभवन येथे आयोजित करण्यात आली आहे.  
 
तरी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (MIDC)  विभागाशी संदर्भात आपले काही प्रश्न, समस्या व सूचना असतील,  तर ते आगाऊ लेखी स्वरूपात अथवा [email protected] ई-मेलव्दारे उद्या दिनांक ०७ मार्च २०२० रोजी दुपारी ०४ वाजेपर्यंत कळवावेत. ही विनंती.
 
कळावे,
आपला विश्वासू
मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन ऑफ सातारा ( मास ) करीता,


धैर्यशील भोसले                                              
सचिव