MAS Admin. Program
म.औ.वि.महामंडळाच्या सेवाशुल्क व पाणीबील दरवाढ बाबत मास कडून निषेध

Satara  December 11,2019

  

प्रति,

मा. उप अभियंता,

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ,

सातारा कार्यालय, सातारा.

 

विषय :- म.औ.वि.महामंडळाच्या सेवाशुल्क व पाणीबील दरवाढ बाबत.

संदर्भ :- आपले कार्यालयाचे परिपत्रक क्र. मु.अ.(मुख्या)/१९/२०१९ दिनांक ११/१२/२०१९.

 

महोदय,

वरील विषय व संदर्भास अनुसरून सातारा औद्योगिक क्षेत्रातील उद्योजकांना नोव्हेंबर २०१९ महिन्यापासून म.औ.वि.महामंडळाच्या सेवाशुल्क व पाणीबीलामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्याचे दिसून येत आहे. सदरची दरवाढ ही उद्योजकांना पुरविण्यात येणाऱ्या सेवा-सुविधा खर्चात वाढ झाल्यामुळे केल्याचे परिपत्रकात म्हटले आहे. परंतु सदरची दरवाढ करताना सन २००८ दरपत्रकाच्या पाचपट केल्याचे दिसून येत आहे. सदयस्थितीत उद्योजक आर्थिक मंदी, वीजदरवाढ, जीएसटी, ग्रामपंचायत कर आकारणी अशा विविध कारणांमुळे डबघाईला आलेले आहेत. त्यामध्येच आता म.औ.वि. महामंडळाच्या सेवाशुल्क व पाणीबील दरवाढीमुळे उद्योजक आर्थिक संकटात आलेले आहेत. तरी आम्ही आपणांस सर्व उद्योजकांच्या वतीने विनंती करतो की, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने दरवाढीची कारणे दिलेली असली तरी सद्यस्थितीत महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून पुरविण्यात येणाऱ्या अपुऱ्या सेवा-सुविधा विचार करता सदरची केलेली दरवाढ ही अन्यायकारक आहे. आम्ही सर्व उद्योजक त्याचा निषेध करत आहोत व आपणांला इशारा देत आहोत की, आम्हांस ही दरवाढ मान्य नाही तथापि आम्ही जुन्या दराने सेवाशुल्क व पाणीबील भरण्यास तयार आहोत. आम्ही हा प्रश्न शासन दरबारी मांडत आहोत कारण केलेली दरवाढ ही उद्योजकांना विश्वासात घेऊन केली नाही. तरी आपण बील भरले नाही म्हणून कोणत्याही उद्योगाचे पाणी पुरवठा बंद करू नये अन्यथा त्याबाबत आंदोलन छेडले जाईल. तसेच म.औ.वि.महामंडळाने आकारलेली सेवाशुल्क भूखंडाचे क्षेत्रफळ व किंमतीच्या प्रमाणात असले पाहिजे. त्याचप्रमाणे सेवाशुल्क आकारणी ही औद्योगिक झोन प्रमाणे व्हावी. सद्यस्थितीत आर्थिक व्यवहारासाठी बँकेकडून रोखी किंवा चेक ऐवजी Online व्यवहार केला तर सूट दिली जाते. याउलट म.औ.वि.महामंडळाचे सेवाशुल्क व पाणीबील भरणा Online केल्यास उद्योजकांना अतिरिक्त रु. १२/- जादा शुल्क भरावे लागतात. हे अन्यायकारक आहे. तरी सदरचे अतिरक्त शुल्क म.औ.वि.महामंडळाने आकारू नये. सद्यस्थितीत महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने औद्योगिक मंदीचा विचार करता कोणत्याही प्रकारे दरवाढ करू नये तसेच दरवाढीचे परिपत्रक रद्द करून उद्योजकांना दिलासा द्यावा. ही विनंती. कळावे, आपला विश्वासू मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन ऑफ सातारा ( मास ) करीता,

सुरिंदर अंबारदार  

अध्यक्ष

 

निवेदन देताना उपस्थित मास पदाधिकारी व उद्योजक नावे पुढीलप्रमाणे  –

1.मास पदाधिकारी - मा. श्री. सुरिंदर अंबारदार- मास अध्यक्ष, श्री. राजेंद्र मोहिते – मास उपाध्यक्ष, श्री. दीपक पाटील- सहसचिव, श्री. जितेंद्र जाधव- चेअरमन, मास एम आय डी सी कमिटी.

2.कार्यकारिणी सदस्य – श्री. श्रीकांत तोडकर, श्री. परेश अदवानी, श्री. राजश चोप्रा, श्री. संजोग मोहिते, श्री. केतन टंकसाळे.

3.मास सभासद – श्री. उदय देशमुख, श्री. भालचंद्र जोशी, श्री. गौरव वखारिया,श्री. स्वप्नील वराडकर, श्री. मयूर पवार, श्री. सतीश पेठकर, श्री. उमेश मुंडडा, श्री. हनीफ सय्यद.