MAS Admin. Program
मास वर्धापनदिन कार्यक्रम (रक्तदानशिबीर )

MAS Bhavan,P-76, Additional M.I.D.C, Satara, 415 004. Satara maharashtra India  February 21,2019

  

रवर्षी मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन ऑफ सातारा ( मास ) वतीने २३ फेब्रुवारी हा दिवस “ मास वर्धापनदिन ” म्हणून साजरा करण्यात येतो.

यावर्षीही मास वर्धापनदिन निमित्त आपल्या सर्वांच्या सहकार्यांने आज गुरुवार , दिनांक २१ फेब्रुवारी २०१९ रोजी सकाळी ९.३० ते सायं.०५.०० वाजेपर्यंत “मासभवन,” येथे रक्तदान शिबीर आयोजित करण्याचे ठरविले आहे.  

अपघातामध्ये, आजारामुळे किंवा छोट्या-मोठ्या शस्त्रक्रिया करतांना कोणाला रक्ताची गरज भासल्यास ते दुसऱ्या कोण्या व्यक्तीकडुनच घ्याव लागते आणि हया गोष्टीचा थेट संबध त्या व्यक्तीच्या जीवन मरणाशी असतो म्हणुनच रक्तदानाला सर्वश्रेष्ठ दान मानले जाते.

तरी आपण स्वत: व आपल्या उद्योगातील कामगार-कर्मचारी यांचेसह सदर आजच्या रक्तदान शिबिरात रक्तदान करण्यासाठी सहभागी व्हावे, ही आग्रहाची विनंती.