Business Training
Industry Connect 2023 Satara ची कार्यशाळा मासभवन येथे आयोजित करण्यात आली होती

  August 18,2023

  

मराठा चेंबर्स ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अॅण्ड अॅग्रीकल्चर, पुणे व मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन ऑफ सातारा (मास) यांचे संयुक्त विद्यमाने सातारा औद्योगिक क्षेत्रातील उद्योजकांसाठी Industry Connect 2023 Satara ची कार्यशाळा दिनांक १८ व १९ ऑगस्ट २०२३ रोजी मासभवन येथे आयोजित करण्यात आली होती. 


सदर कार्यशाळेमध्ये Vendor Development Series- Opportunities for MSME’s बाबत उपस्थित उद्योजकांना मार्गदर्शन करण्यात आले. 

यामध्ये सातारा औद्योगिक क्षेत्रातील उद्योजकांना उद्योगांशी नेटवर्किंग करून त्यांचा व्यवसाय वाढवू पाहणाऱ्यांसाठी हा उपक्रम मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन ऑफ सातारा (मास) व MCCIA यांचेमार्फत एकत्रितरीत्या सातारा जिल्ह्यामध्ये राबविण्यात येत आहे. त्यामध्ये MCCIA च्या पुढाकाराने डिफेन्स सेक्टर मधील एल & टी, माजगाव डॉकस, भारत फोर्ज लि. व इतर डिफेन्स सेक्टरमध्ये काम करणाऱ्या आस्थापना यांच्या सहकार्याने मास सभासदांसाठी वेंडर डेव्हलपमेंट प्रोग्राम आयोजित करण्यात आला होता. 

त्याचप्रमाणे यावेळी सदर ठिकाणी औद्योगिक संबंधित उत्पादनांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते.  

यावेळी मा. मास अध्यक्ष श्री. राजेंद्र मोहिते, मा. श्री. निखील जैन, Director, MCCIA मा. श्री. सतीश जोशी, Associate Director,MCCIA , श्री. अनिरुध्द ब्रम्हा, Dy. Director, MCCIA, मा. मेजर श्री. साकेत पाठक, RTN, HQ, SC,  मा. श्री. सुहास झेंडे, Outsorcing Opportunities with DPSU’s, मा. श्री. यतीन तांबे, Chairman, Friction Welding Technologies Pvt. Ltd., मा. श्री. नितीन गाड, Head (SCM&Purchase) Miba Brivetech,  मा. श्री. अर्प्रीत राठी Head SCM & श्री. उदय ढवळे,  Production Mgnt Head Dana Anand  India Pvt.Ltd. मा. श्री. प्रीतेश भेंडे,   मा. उपाध्यक्ष श्री. जितेंद्र जाधव, मा. सचिव श्री.धैर्यशील भोसले, खजिनदार श्री. भरत शेठ, सहसचिव श्री.दीपक पाटील, सहसचिव श्री. राजेश चोप्रा,  कार्यकारिणी सदस्य श्री. सुहास फरांदे, श्री. आदित्य मुतालिक,  श्री.संग्रामसिंह कोरपे, माजी अध्यक्ष श्री. शिरीख खुटाळे, श्री. राजेश कोरपे तसेच बहुसंख्येने मास सभासद उपस्थित होते.

सदर कार्यक्रमाचे प्रस्तावना व आभार मा. श्री अनुप मुथा, चेअरमन, मास बिझनेस प्रमोशन & व्होकेशनल ट्रेनिंग कमिटी यांनी केले.