WEC 
महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ, गट कार्यालय सांगली यांचेवतीने विविध आस्थापनांच्या व्यवस्थापकांकरिता चर्चासत्र कार्यक्रमांचे आयोजन मासभवन येथे करण्यात आले होते.

  July 27,2023

  

महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ, गट कार्यालय सांगली यांचेवतीने विविध आस्थापनांच्या व्यवस्थापकांकरिता चर्चासत्र कार्यक्रमांचे आयोजन दिनांक २७ जुलै २०२३ रोजी सकाळी ११ वाजता मासभवन येथे करण्यात आले होते. यावेळी कामगार यांचेसाठी महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ, यांचेकडून राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती उपस्थितांना देण्यात आली. सदर कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून मा. मास अध्यक्ष श्री. राजेंद्र मोहिते, व प्रमख पाहुणे म्हणून मा. श्री. रेवणनाथ भिसले, सहा.कामगार आयुक्त, सातारा व मा. श्री. नितीन देशपांडे कॉर्पोरेटेड हेड & एच आर कुपर कॉर्पोरेशन प्रा.लि. सातारा, मा. सौ. शंकुतला पवार, डेप्युटी डायरेक्ट, मुथा ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज, सातारा व विशेष उपस्थिती मा. श्री. विक्रमसिंह शिंदे, सी ई ओ सातारा हॉस्पिटल & डायग्नोस्टीक सेंटर, सातारा मा. श्री. संभाजी पवार, प्र. कामगार कल्याण अधिकारी, गट कार्यालय, सांगली व औद्योगिक संघटनाचे प्रतिनिधी, उद्योजक बहुसंख्येने उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक मा. श्री. संदीप कांबळे, केंद्र प्रमुख, कामगार कल्याण केंद्र, सातारा यांनी केले.